मुलगा नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढलं

June 29, 2016 3:30 PM0 commentsViews:

यवतमाळ – 29 जून : मुलाच्या हवाशापोटी पत्नीला बेदम मारहाण करून घराबाहेर काढण्याची संतापजनक घटना यवतमाळमध्ये घडलीये. या प्रकरणी पती ज्ञानेश्वर राठोडविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.yavatmal3

यवतमाळ जिल्ह्यातल्या वडद गावात अशीच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आलीये. ज्ञानेश्वर राठोड या व्यक्तीनं एकही मुलगा झाला नाही म्हणून बायकोला घराबाहेर काढलंय. त्याची पत्नी कविता राठोड हिला सलग 4 मुली झाल्या, याचा राग मनात धरून त्यानं बायकोला मारहाण करत घराबाहेर काढलं. हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद करण्यात आल्यामुळे पुढे आला. मारहाण करणार्‍या ज्ञानेश्वर राठोडविरोधात वडद पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये. धक्कादायक म्हणजे कविता घरात नाही तर गुरांच्या गोठ्यात राहत होती. दरम्यान, या प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा