यकृत दान करून मुलाने वाचवले वडिलांचे प्राण !

June 29, 2016 4:50 PM0 commentsViews:

पुणे – 29 जून : वडिलांचं यकृत निकामी झाल्याने जिवंतपणीच वडिलांना स्वत:च्या शरीरतील यकृत दान करण्याचा साहसी निर्णय पुण्यातील आकाश काळभोर या तरुणाने घेतला.

organ_donationआकाशचे वडील धनजंय यांच्या पोटात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांच यकृत निकामी झालं, त्यांनतर आकाशने आपल्या वडिलाच्या उपचारा करीता अवयदान यादीत नाव नोंदलं. घरातील पुरुषचं आजारी पडल्याने आकाशच्या घरातील आर्थिक गणित कोलमडलं आणि त्यात योग्यवेळी दान केलेलं यकृत मिळत नसल्याने आकाशच्या वडिलांच्या जीवाला धोका वाढायला लागला, वडिलांचं जीवन वाचवण्याकरीता स्वतःच यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.

त्या नंतर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये आकाश आणि त्याच्या वडिलावर अतिशय गुतागुंतीची लिव्हर ट्रांसप्लट शस्त्रक्रिया करण्यात आली. इतर तरुणांनीही अवयदानकरीता ब्रेन डेड झालेल्या रुग्णावर अवलंबून न राहता आणि स्वत:च्या जीवाची कुठलीही भीती न बाळगता गरजु रुग्णांना अवयव दान करण्याचं आव्हान आकाशनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा