स्पेशल रिपोर्ट : वाद आंबेडकर भवनाचा !

June 29, 2016 5:01 PM0 commentsViews:

रणधीर कांबळे, मुंबई – 29 जून : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या आंबेडकर भवनच्या मालकीचा वाद चिघळलाय. ही जागा पिपल्स इंम्प्रुमेंट ट्रस्टची असल्याचा दावा राज्याचे माहिती आयुक्त आणि या ट्रस्टचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी केलाय. तर आंबेडकर भवन रात्री बेकायदेशीरपणे तोडल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.ज् ार कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.ambedkar_bhavan

दादर येथील बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळीसाठी उभारलेलं हे आंबेडकर भवन नामशेष झालंय. पिपल्स इम्प्रुमेंट ट्रस्टनं हे काम रात्री 2 च्या दरम्यान केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केलीय.

आंबेडकर भवनची इमारत मोडकळीस आल्याचा दावा खोटा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. ही इमारत मजबूत असल्याचा रिपोर्ट पालिकेच्या अभियंत्यानं दिल्याचा दावाही त्यांनी केलाय. राज्याचे माहिती आयुक्त असणारे रत्नाकर गायकवाड हे या ट्रस्टचे सल्लागार आहेत. त्यांनी आपण नियमानुसार काम केल्याचा दावा केलाय. उलट ही जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांवर केलाय.

आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण मुळात ही वास्तू रात्री उशिरा का पाडली गेली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा