सलमान खान हाजीर हो, महिला आयोगाचे आदेश

June 29, 2016 5:44 PM0 commentsViews:

29 जून : सुलतानमध्ये शुटिंगनंतर मला एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यासारखं वाटायचं असं बेशिस्त वक्तव्य करणार्‍या अभिनेता सलमान खानने माफी तर दूरच साधी दिलगिरीही व्यक्त करण्याची तसदी घेतली नाही. आज त्याने महिला आयोगाला एका पत्राद्वारे आपली भूमिका मांडली. पण आयोगाने त्याला 7 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.salman_khan_sultan (6)

या ना त्या प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकणार्‍या सलमान खानने पुन्हा एकदा स्वता:वर वाद ओढावून घेतला. एक मुलाखतीदरम्यान, आगामी सिनेमा सुलतानमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारलीये. हे काम खूप थकवण्यासारखं होतं. जेव्हा सुलतानचं शुटिंग पूर्ण व्हायचं तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं असं वक्तव्य सलमाननं केलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे चौहीबाजूने टीका झाली. सलमानचे वडिल सलीम खान आणि भाऊ सोहेल खानने याबद्दल सर्वांची माफी मागितली.

सलमानच्या या वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली. आज महिला आयोगापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. मात्र या सुनावणीवेळी सलमान खान किंवा त्याचे वकील उपस्थित न राहाता त्यांनी एक पत्र आयोगापुढे सादर केलं. मात्र या सादर केलेल्या पत्रात कोणतंही तथ्य नसल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांनी म्हटलंय. पुढची सुनावणी ही 7 जुलैला होणार आहे. सलमान आणि त्याच्या वकीलानं सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा