निळू फुले सन्मान प्रदान

April 4, 2010 1:53 PM0 commentsViews: 3

4 एप्रिलअभिनेते निळू फुले यांच्या नावाने देण्यात येत असलेला पहिलाच निळू फुले सन्मान 2010 पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईत पार पडला. हा पुरस्कार देऊन तीन मान्यवरांना गौरवण्यात आले. लोककला क्षेत्रातून यमुनाबाई वाईकर, सिनेनाट्य क्षेत्रातून किशोर कदम, तर सामाजिक क्षेत्रातून संजीव साने यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेते मोहन आगाशे आणि अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती.

close