सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात राडा घालणार्‍या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी थोपाटली पाठ !

June 29, 2016 7:04 PM0 commentsViews:

मुंबई – 29 जून : सुधींद्र कुलकर्णी यांच्या कार्यक्रमात दोन शिवसैनिकांनी राडा घातला होता. याशिवसैनिकांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाबासकी दिलीये.Uddhav2312

ऑबझरवर रीसर्च फाऊंडेशन सीएसटी भागातील पत्रकार संघात दुपारी 2:30 वाजता ‘मुंबई काराची फ्रेंन्डशिप फोरम’चं आयोजन केलं होतं. यामध्ये तसवीर-ए-मुंबई आणि तसवीर-ए-कराची या विषयावर चर्चासत्र पार पडलं. ज्यामध्ये सुधींद्र कुलकर्णी आणि पाकिस्तानहून आलेले 5 फोटो जर्नलिस्ट सहभागी झाले होते.

याचाच निषेध करत 2 शिवसैनिक या कार्यक्रमात घुसले होते. त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली होती. पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. आज ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी दोन्ही शिवसैनिकांची पाठ थोपटलीये. मला अभिमान आहे जे मला असे शिवसैनिक भेटले अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा