रिंकूचा नवीन ग्लॅमरस लूक

June 29, 2016 7:16 PM0 commentsViews:

सैराट सिनेमातली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुच्या अभिनयाची जादू सध्या सगळीकडे पसरलीये. आर्ची म्हणून सिनेमात झळकलेली रिंकु बाहेर अनेक इव्हेनटला अथवा मुलाखतींसाठी सिनेमातल्या आर्चीच्या रुपातंच फिरताना दिसतीये. पंजाबी ड्रेस, केसांची वेणी आणि हलक्या मेकअपमध्ये ही सगळ्यांची लाडकी आर्ची विविध कार्यक्रमात दिसली. पण आता मात्र रिंकुने तिच्या आर्चीच्या लूकला कलाटणी देण्याचं ठरवलंय. फॅशनेबल पंजाबी, त्यावर मोकळे केस आणि ग्लॅमरस मेकअपच्या लूकमधले तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हा लुकसुद्धा भाव खाऊन जाणार आहे यात काही वाद नाही. पण हा लूक सहज आहे. एक चेंज म्हणून की कुठल्या पुढच्या सिनेमासाठी हे मात्र अद्याप उघड झालेलं नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा