लक्षात असू द्या !, 30 सप्टेंबरच्या आधी संपत्ती जाहीर करा अन्यथा…

June 29, 2016 8:36 PM0 commentsViews:

money found29 जून : काळा पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आपली संपत्ती सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचं आवाहन केलंय. आयकर विभागानेही त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू केली. 30 सप्टेंबरच्या आत टॅक्स भरून संपत्ती नियमित करण्याचे आवाहन आयकर विभागाने केलंय.

देशात असलेल्या काळ्या पैशाच्या विरोधात केंद्र सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्यामध्ये 45 टक्के टॅक्स भरून आपला काळा पैसा, आणि संपत्ती नियमित करता येणार आहे. या विशेष मोहीम असलेल्या इन्कम डिक्लेरेशन स्किमसाठी 30 सप्टेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला असून त्यानंतर दोन महिन्यात आयकर भरण्याची मुभा करदात्यांना मिळणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक आयकर कार्यालय किंवा ऑनलाईन सुविधा देण्यात आल्या आहे.

विशेष म्हणजे हां कर तुम्ही कुठून कसा आणला याची विचारणा देखील आयकर विभाग करणार नाहीये. त्यामुळे आयकर विभागाने जास्तीजास्त नागरिकांनी या स्किम चा फायदा घेण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे .या स्किमची मुदत संपल्यावर आयकर विभाग मोठ्या प्रमाणात मोहीम राबावून देशातील काळा पैसा आणि संपत्ती शोधून कारवाई करणार आहे. त्यामुळे त्या आधी या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन आयकर विभागाने केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा