पुण्याजवळ अपघात, 10 ठार

April 5, 2010 8:55 AM0 commentsViews:

5 एप्रिलपुण्याजवळ कात्रजच्या नवीन बोगद्याशेजारी जीपला झालेल्या अपघातात 10 जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत. मृतांमधे 6 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.जंाभूळवाडीजवळ मॅक्स क्रूझर ही गाडी कंटेनरला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण सातार्‍यातील दहीवाडी इथून मुंबईला निघाले होते. सुरुवातीला गाडीचे चाक निखळल्याने अपघात झाल्याचे ड्रायव्हरने सांगितले होते. पण नंतर धडकलेला कंटेनर पोलिसांना मिळाला. दीड वर्षाचे मूल बचावलेया अपघातात दीड वर्षाचा मुलगा वाचला आहे. विशेष म्हणजे या मुलाला अंगावर साधे खरचटलेलेही नाही. पण अपघातानंतर हा मुलगा बराच वेळ घाबरलेला होता. सुयश जगन्नाथ ढोपे असे त्याचे नाव आहे. दुदैर्वाने अपघातात त्याच्या आई, वडिलांचा मृत्यू झाला आहे.

close