नांदेडमध्ये पावसाचे धूमशान

June 30, 2016 7:38 PM0 commentsViews:

नांदेड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झालीये. आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, हदगाव आणि अर्धापुर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतोय. या पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आला. हिमायतनगर – भोकर रस्त्यावरील हरडप इथल्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने भोकर किनवट हा मुख्य मार्ग बंद झाला होता. वाहनाच्या मोठ्या रांगा या रस्त्यावर लागल्या होत्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा