हिंगोलीत अतिवृष्टी

June 30, 2016 7:38 PM0 commentsViews:

 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय. जोरदार पावसामुळं बर्‍याच घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरलं. कुरुंदा परिसरातील 1 ते दीड हजार हेक्टरवर असलेली पीकं पाण्यात वाहून गेली आहे. शेळ्या,मेंढ्या, आणि गुरेही पाण्यात वाहून गेली आहेत. वसमत शहरात तसंच ग्रामीण भागात तुफान पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे अकोला-पुर्णा रेल्वे मार्गावर पांगरा शिंदे येथे रेल्वे पटरी खालची गिटी वाहून गेल्याने अकोला-पूर्णा रेल्वे 2 तास उशिरा धावली. कुरुन्द्याच्या रस्त्यावरून नदी प्रमाणे पाणी वाहु लागले. मागील तीन वर्षात प्रथमच अशा प्रकारे कुरुंदा येथे अतिवृष्टी झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा