गळ टोचण्याची प्रथा सुरूच

April 5, 2010 9:25 AM0 commentsViews: 49

5 एप्रिलऔरंगाबादजवळच्या शेंद्रा गावातील मांगीरबाबा यात्रेतील अघोरी प्रथा अजूनही सुरू आहेत. यावर्षी तर यात्रेत या अनिष्ट प्रथा पाळणार्‍यांची संख्या वाढलेली दिसली. सुमारे शंभर वर्षांपासून शेंद्रा इथे मांगीरबाबा यात्रा भरते. मांगीरबाबाला नवस करणारे लाखो नागरिक या यात्रेसाठी एकत्र येतात. कोंबडी कापली जातात, बोकड्यांचे बळी दिले जातात. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या यात्रेत नवस बोलणार्‍यांच्या कमरेला लोखंडी गळ टोचला जातो.यात्रेसाठी लाखो भाविक गर्दी करतात. महाराष्ट्राच्या बाहेरूनही मातंग समाजाचे लोक या यात्रेसाठी येतात. या यात्रेतील अनिष्ट प्रथांविरूध्द वेळोवेळी आवाज उठवूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

close