कोकण वगळता राज्यात मान्सूनचा फ्लॉप शो !

June 30, 2016 8:28 PM0 commentsViews:

monsoon_rain30 जून : चातकासारखी वाट पाहुन असलेल्या मान्सूनने पहिल्याच महिन्यात फ्लॉप शो केलाय. जून महिना आता संपलाय. पण, संपूर्ण देशात आत्तापर्यंत जून महिन्यात पडणार्‍या पावसाच्या सरासरीपेक्षा 12 टक्के पाऊस कमी झालाय. 8 दिवसांपूर्वी हा आकडा 20 टक्के होता. महाराष्ट्राचा विचार केला तर जून महिन्यातील आकडेवारीनुसार कोकण मराठवाडा या भागात सरासरीएवढा पाऊस पडला आहे.

मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा तब्बल 30 टक्के पाऊस कमी झालाय. मुंबईत दमदार पाऊस झालाय, पण पुण्यात सरासरीपेक्षा 50 टक्के पाऊस कमी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. आता 3 जुलैला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ज्या तालुक्यात,गावात 28 आणि 29 जूनला पाऊस झालाय आणि पेरण्या केल्या आहेत तिथं शेतकर्‍यांनी जमेल तसं पाणी द्यावं असा सल्ला पुणे वेधशाळेचे संचालक चटोपाध्याय यांनी दिलाय.

जून महिन्यातील पावसाच्या आकडेवारी

कोकण आणि गोवा
- 743.2 मिलिमीटर
- सरासरीपेक्षा 12 टक्के जास्त

मध्य महाराष्ट्र
- 97.6 मिलिमीटर
- सरासरीपेक्षा 30 टक्के कमी

विदर्भ
- 139 मिलिमीटर
- सरासरीपेक्षा 13 टक्के कमी

मराठवाडा
-139 मिलीमीटर
- सरासरीपेक्षा केवळ 1 टक्का जास्त
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा