बदल्यांच्या विरोधात सरकारी डॉक्टरांचे आंदोलन

April 5, 2010 9:36 AM0 commentsViews: 7

5 एप्रिल ग्रामीण भागात झालेल्या बदल्यांच्या विरोधात सरकारी डॉक्टरांनी आजपासून आंदोलन पुकारले आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या 2 हजार 700 जागा रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी राज्य सरकारी हॉस्पिटलमधील 400 वैद्यकीय अधिकार्‍यांची ग्रामीण भागात बदली केली. या जागा थेट न भरता डॉक्टरांच्या बदल्या करून सरकार धूळफेक करत आहे, असे या डॉक्टरांचे मत आहे. या आंदोलनामुळे गुन्हेगारांची आरोग्य तपासणी, भांडणांत जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार आणि शवविच्छेदन या सेवेवर परिणाम होणार आहे. या आंदोलनाची पूर्व कल्पना 'मॅग्मो'ने 8 दिवसांपूर्वीच दिली होती.

close