मी तसं बोललोच नाही, एकनाथ खडसेंचं घूमजाव

July 1, 2016 2:27 PM0 commentsViews:

01 जुलै : ‘मी जर बोललो तर देशाला हादरा बसेल’ असं वक्तव्य करणारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अवघ्या 24 तासांत यू-टर्न घेतलाय. मी तसं काही बोललोच नाही, मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगत त्यांनी मीडियावरच खापरं फोडलं.

Eknath-Khadse2मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर एकनाथ खडसे आपल्या होमगाऊंड असलेल्या जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी जोरदार बॅटिंग केली. पक्षात आपले विरोधक आहे आणि त्यांचा या कटात सहभाग आहे. मी जर आता बोललो तर देश हादरून जाईल असं वक्तव्य खडसे यांनी केलं होतं. एवढंच नाहीतर त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही टीका केली होती.

आपल्याच नेत्यांवर आरोप करुन खळबळ उडवून दिल्यानंतर एकनाथ खडसेंनी आता आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केलंय. आपण जे बोललो त्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावाच खडसेंनी केलाय. दाऊदशी संबंध असल्याचं सिद्ध झालं असतं तर संपूर्ण देश हादरला असता असं आपल्याला म्हणायाचं होतं अशी सारवासारव केली. या वक्तव्यावरुन बराच वादंग निर्माण झाला. त्यामुळे अवघ्या 24 तासांत खडसेंनी वक्तव्यावरुन घूमजाव करीत माध्यमांवर खापर फोडलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा