नाशिकमध्ये गुंडाराज, आरोपींनी पोलिसांनाच केली मारहाण

July 1, 2016 5:00 PM0 commentsViews:

नाशिक – 01 जुलै : नाशिकमध्ये सेंट्रल कोर्टाच्या आवारात आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या दोन महिन्यांमध्ये पोलिसांना मारहाण करण्याची ही चाैथी घटना आहे.

nashik+policeया आरोपींना तुरुंगातून कोर्टात नेताना दोन पोलिसांना या आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करत पोलिसांना तुफान मारहाण केली. पोलीस व्हॅनमध्ये एकूण 8 आरोपी आणि दोन पोलीस होते. या आरोपींनी कोर्टात जाण्यासाठी स्वतंत्र्य वाहनाची मागणी केली. पण पोलिसांनी त्यासाठी नकार दिला. आणि पोलिसांच्या व्हॅनमधूनच या आरोपींना कोर्टात नेण्यात आलं.

मात्र, बसण्याच्या जागेवर आरोपींनी पोलिसांशी वाद घातला. या वादामुळे या आरोपींनी पोलिसांनाच मारहाण केली. गेल्या दोन महिन्यातील पोलिसांना मारहाण करण्याची चाैथी घटना आहे. याआधीही पोलिसाला भर कोर्टात आरोपीने मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा