तत्काळ तिकीट माफियांचा पर्दाफाश, टोळी जेरबंद

July 1, 2016 5:43 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई, 01 जुलै: रेल्वेचा तत्काळ तिकीटांचा कोटा एक किंवा दोन मिनिटांतच कसा संपतो हा तुम्हा आम्हा सगळ्यांना पडणारा प्रश्न… हे कोडं रेल्वेलाही पडलं होतं. पण हे कोडं आता सुटलंय. एका सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं अवघ्या 50 सेकंदात तत्काळ तिकीटं काढणार्‍या एका टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केलाय.railway_ticket

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर अगोदर लॉग इन करावं लागतं आणि त्यानंतर तिकीटाची माहिती भरावी लागते. पण दलालांच्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अगोदरच भरुन ठेवली जाते. आणि एका क्लिकवरच दलालांना तिकीट मिळून जातं. तीन हजारांना हे सॉफ्टवेअर ऑनलाईन विकलं जात असून या सॉफ्टवेअरच्या मदतीनं दलाल तिकीटांचा काळाबाजार करतायेत.

ही टोळी एकाच वेळी पन्नास ते साठ तिकीटं बुक करायची. देशातले अनेक दलाल हे सॉफ्टवेअर वापरत असल्यानं काही व्यस्त मार्गांवरील तत्काळ तिकीटं एक दोन मिनिटांतच संपून जातात.

पोलिसांनी दलालांना पकडलं असलं तरी सॉफ्टवेअर बनवणारे मोकाटच आहेत. या सॉफ्टवेअर बनवणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या तर तत्काळ तिकीटांचा हा घोळ निश्चितच कमी होईल यात शंकाच नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा