असा आहे आपला ‘तेजस’ !

July 1, 2016 5:54 PM0 commentsViews:

01 जुलै : तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतीय बनावटीचं पहिलं लढाऊ विमान तेजस आज वायुदलात दाखल झालं. बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आज हे विमान दाखल झालं.

तेजसला भारतीय वायुदलात दाखल करून घेण्यात अनेक अडचणी आल्यात मात्र तंत्र सरकारच्या हिंदूस्थान एअरोनॉटीकल लिमिटेड म्हणजेच एचसीएलनं तेजस तयार केलंय. तेजसनं सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्या असून आत्तापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त वेळा तेजसनं
उड्ड्ाण केलंय. सुरवातीला या ताफ्यात 2 विमानं असतील नंतर ही संख्या वाढवली जाणार आहे. जगातल्या अत्यंत आधुनिक लढाऊ विमानांमध्ये तेजसचा समावेश केला जातोय.

- ‘तेजस’ची वैशिष्ट्ये

- 1983 साली निवृत्तीकडे झुकलेल्या मिग-21एस विमानांच्या जागी ‘तेजस’ या देशी बनावटीच्या विमानांचा प्रस्ताव
- 1986 साली या प्रकल्पासाठी 575 कोटींची तरतूद
- जानेवारी 2001 मध्ये तेजसची पहिल्यांदा हवेत झेप
- तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी नाव ठेवले
- हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल
- हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल
- अँटी शिप मिसाईल, बॉम्ब आणि रॉकेट्स वाहून नेण्याची क्षमता
- 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के ऍल्युमिनियम धातू मिश्रण आणि उर्वरित टायटॅनियम धातूंच्या मिश्रणातून विमानाची बांधणी
- तेजस लढाऊ विमानाच्या 2 प्रकारात उपलब्ध
- पहिल्या प्रकारात केवळ वैमानिकासाठी जागा तर दुसर्‍या प्रकारातील विमान हे वैमानिक आणि सहकारी अशा 2 सीट
- याआधी तेजस हे लढाऊ विमान बेहरिन आंतरराष्ट्रीय हवाई कार्यक्रमात 2016 मध्ये प्रात्यक्षिक म्हणून दाखल
- या कार्यक्रमात तेजसची तुलना पाकिस्तानच्या जेएफ-17 थंडर या लढाऊ विमानाशी
- भारतीय हवाई दलातील सर्वात हलके लढाऊ विमान म्हणून तेजसची ओळख
- तेजसच्या एफओसी प्रकारातील विमानाचा कमाल वेग 2,205 किमी प्रति तास
- आयओसी प्रकारातील विमानाचा कमाल वेग हा 2,000 किमी प्रति तास


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा