आयपीएलच्या मॅच नागपूरमध्ये

April 5, 2010 10:12 AM0 commentsViews: 2

5 एप्रिलनागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर आज पहिल्यांदाच आयपीएलची मॅच रंगणार आहे. डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम आमने-सामने येतील. आयपीएलच्या दोन मॅच या मैदानावर खेळवल्या जाणार आहेत. या पैकी पहिली मॅच आज खेळवली जाणार असून, रात्री आठ वाजता मॅच सुरू होईल. मॅचसाठी व्हीसीएने जोरदार तयारी केली आहे. आणि नागपूरकरांमध्येही या मॅचविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या मॅचसाठी डेक्कन आणि राजस्थान या दोन्ही टीमचे खेळाडू नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. आयपीएलची मॅच पहिल्यांदाच नागपूर मध्ये होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. व्हीसीए मैदान हायवेला लागूनच आहे. त्यामुळे ट्रॅफिकची कोंडी होवू नये यासाठी हायकोर्टाने वाहतूक विभाग आणि व्हीसीए ला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

close