चंद्रभागेचा तीरावर खड्डेच खड्डे !

July 1, 2016 9:16 PM0 commentsViews:

01 जुलै : वारकर्‍यांना आता पंढरपूरची ओढ लागलीये. लाखो पावलं पंढरपूरकडे निघाली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीचं विशेष महत्त्व आहे. पण, वाळू माफियांनी चंद्रभागेचा तीर असा पोखरलाय की नुसता वाळवंट करून ठेवलंय. तीरावर जिकडे नजर जाईल तिथे खड्डेच खड्डे तुम्हाला पाहण्यास मिळेल.chandrabhaga3

वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये चंद्रभागा नदी आणि तिच्या तीरावर विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटाला अनन्य साधारण महत्व आहे. संतांनी आपल्या अभंगांमधून आई आणि बहिणीची उपमा दिलीय. संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलंय, “वाराणसी गया व्दारका परी नये तुका पंढरीच्या…. तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी, तयाचिये घरी यम न ये.. “तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही नुसतं पंढरपूरला जाऊन आलात तरी तुमच्या घरीकडे यमसुद्धा फिरकणार नाही. पण तुकोबांनी वर्णन केलेली चंद्रभागा आणि तिचे वाळवंट सध्या नरकाची भूमिका पार पडतंय असं खेदाने म्हणावे लागेल. कारण वाळवंटाची वाळू माफियांनी केलेली दुर्दशा पहिली की यम तुम्हाला वाळवंटातच गाठू शकतो इतकी भयावह अवस्था वाळू चोरट्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटाची करून ठेवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा