ढाका हल्ला : अपहरणनाट्य संपलं, सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

July 2, 2016 5:35 PM0 commentsViews:

dhaka_attackबांगलादेश – 02 जुलै : बांगलादेशची राजधानी ढाकामधलं दहशतवादी अपहरणनाट्य संपलंय. या दहशतवादी हल्ल्यातल्या सहा दहशतवाद्यांना बांगलादेशी सुरक्षा यंत्रणांनी ठार केलंय. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय असं वृत्त आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने स्वीकारली आहे.

‘होली आर्टिझान बेकरी’ या या परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असणार्‍या कॅफेमध्ये या दहशतवाद्यांच्या गटाने आज पहाटे प्रवेश मिळवत 35 जणांना ओलीस धरलं. त्यातले 20 जणं परदेशी होते. या दहशतवाद्यांकडे बॉम्बसकट अनेक शस्त्रास्त्रं होती. बांग्लादेशी सुरक्षा यंत्रणांनी लगेचच कारवाई सुरू करत या परिसराला वेढा घातला. अनेक चिलखती वाहनंही या कॅफेच्या परिसरात हलवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी या कॅफेत प्रवेश करत दहशतवाद्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना ठार केलं. ओलीस धरलेल्या नागरिकांपैकी किमान 13 जणांना वाचवण्यात यश आलं असल्याचं वृत्त आहे. तर आयसीसने आपल्या या हल्ल्यांत 24 जण ठार तर 40 लोक जखमी झाल्याचा दावा केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा