नाशिककडे पावसाने फिरवली पाठ, नाशिककरांनी घातलं देवाला साकडं

July 2, 2016 5:43 PM0 commentsViews:

nsk43242rainनाशिक – 02 जुलै : जून महिना संपला तरीही नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्याने नाशिककरांसमोर पाण्याचे मोठे संकट उभं राहिलंय. पाऊस नसल्यानं धरणं कोरडी ठाक पडली आहे. पाण्यासाठी आता देव-देवतांना साकडं घालण्यास सुरूवात झाली आहे.

यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. सध्या राज्यात अन्यत्र पावसाला सुरूवात झाली असली तरी नाशिकमध्ये अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे धरणंही कोरडी ठाक पडली आहेत. यासाठीच नगरसेवक विलास शिंदे यांनी प्रसिद्ध सोमेश्वर महादेव मंदिरात 101 जोडयांचा महापर्जन्य योगाचे आयोजन केलंय. यावेळी मंत्र उच्चारात चांगला पाऊस पडू दे यासाठी वरून राजाला साकडे घालण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपूर्वीही जून महिना संपून सुद्धा पाऊस झाला नव्हता त्यावेळी देखील अशा प्रकारचा महापर्जन्य योग करण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा