पाकिस्तानात 5 स्फोट

April 5, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

5 एप्रिल पाकिस्तान आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरून गेले. पाकिस्तानातील पेशावरमध्येच हे स्फोट झाले आहेत. यात 12जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 3 बॉम्बस्फोट अमेरिकन दूतावासासमोर झाले आहेत. यात या दूतावासाचे मुख्य गेट पूर्णपणे उध्वस्त झाले. तर दुसरा स्फोट तिमरगरा या ठिकाणी झाला आहे. या स्फोटामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, हे अजून कळू शकलेले नाही.पण उत्तर पश्चिम प्रांताचे नाव बदलण्याच्या विरोधात हे बॉम्ब स्फोट करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close