ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

July 2, 2016 10:24 PM0 commentsViews:

jain32202 जुलै : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडलंय. या हल्ल्यात तारुषी जैन या 19 वर्षांच्या भारतीय तरुणीचा मृत्यू झालाय.

दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये तारुषी जैनदेखील होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन तारुषी जैनची हत्या झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून दुख: व्यक्त केलं आहे.

तारुषीचे वडील संजीव जैन यांच्याशी मी बातचीत केली असून देश त्यांच्यासोबत असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे. तारुषी जैन 19 वर्षांची होती. ढाकामधील अमेरिकन स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केलं होतं. शुक्रवारी रात्री ढाका येथील गुलशन परिसरातील रेस्टॉरंटवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इटलीचे 8 नागरिक, जापानी, उत्तर कोरिया, एक भारतीय आणि काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा