पगार 18 हजार, अन् संपत्ती 16 कोटी !, ‘लेडी नटवरलाल’ पोलिसांच्या जाळ्यात

July 2, 2016 10:29 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई – 02 जुलै : मुंबई पोलिसांनी वृषाली बामणे नावाच्या एका लेडी नटवरलालला गजाआड केलंय. वृषाली ज्या कंपनीत काम करायची त्याच कंपनीला तब्बल 16 कोटींना गंडा घातलाय.

ही आहे वृषाली बामणे…अवघा 18 हजार पगार असलेल्या या वृषाली बामणेनं 16 कोटींची माया गोळा केलीये. ज्या कंपनीत वृषाली काम करत होती त्याच कंपनीला वृषाली बामणेनं 16 कोटींना चुना लावलाय.

vrashali3

वृषाली चार वर्षांपासून मुंबईतल्या एका कंपनीत अकाऊंटट असिस्टंट म्हणून काम करायची. कंपनीनं टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिनं कंपनीला गंडा घातला. या पैशातून तिनं अलिशान गाड्या आणि फ्लॅट आणि बंगले खरेदी केले.

चार वर्षांपासून वृषालीचा लुटीचा धंदा बिनबोभाटपणं सुरू होता. पण शेवटी तिच्या पापाचा घडा भरला असून आता वृषाली गजाआड झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा