‘माफी किंवा तडजोड नाही’

April 5, 2010 11:33 AM0 commentsViews: 2

5 एप्रिलआयेशा सिद्दीकीने माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी केलेल्या या आरोपांवरून मी तिची माफी मागण्याचा किंवा तडजोड प्रश्नच येत नाही, असे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने म्हटले आहे. सानिया मिर्झा आणि शोएबच्या 15 तारखेला होणार्‍या विवाहापूर्वीच आपले शोएबसोबत पूर्वी निकाह झाल्याचा दावा आयेशाने केला आहे. त्यासाठी तिने शोएबविरुद्ध फसवणूक आणि नुकसानभरपाईची तक्रारही केली आहे. या सर्व वादाच्या पार्शवभूमीवर शोएब आणि सानिया आज जोडीने मीडियाला सामोरे गेले. मी जसा मीडियासमोर येतो, तशी आयेशा का येत नाही? असा सवाल यावेळी शोएबने उपस्थित केला. तर लग्नाच्या अगोदर 10 दिवस मीडियातून आपल्या लग्नाची अशी चर्चा होणे कोणालाही आवडणार नाही, असे सानिया म्हणाली. त्याबरोबर आयेशाबाबतचा वाद कोर्टात सुटेल, त्याबाबत मीडियाने भाष्य करून आमच्या भावना दुखवू नयेत, असे आवाहनही तिने केले. आयेशासोबत कोर्टाबाहेरही तडजोड करणार नसल्याचे या दोघांनी यावेळी स्पष्ट केले.

close