गडचिरोलीत पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

July 3, 2016 4:31 PM0 commentsViews:

03 जुलै: गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दक्षिण गडचिरोलीमधल्या एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात सर्वाधिक फटका बसलाय.gadchiroli_33342-1

शुक्रवारी संध्याकाळी पर्लकोटा नदीचा पूर ओसरला. त्यानंतर बांडे नदीला पूर आला. त्यामुळे 120 गावांचा संपर्क तुटलाय. आलापल्ली ते भामरागड दरम्यान पेरमिलीच्या पुढे चंद्र या गावाजवळ बांडे नदीवरचा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. आणि संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. नंतर हे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली.

दुसरीकडे, एटापल्ली तालुक्यात कसनसुर गट्टा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने घोटसुरचा मामा तलाव फुटला. त्यामुळे 35 एकर शेती पाण्याखाली गेलीये. त्यात शेतक­-यांचं नुकसान झालंय. मुसळधार आणि संततधार पावसामुळे एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातले वीसपेक्षा जास्त खांब पडले आहेत. त्यामुळे 20 पेक्षा जास्त गावांचा वीजपुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झालाय. जंगलात पडणा­-या पावसामुळे खांब उभे करण्यात अडचण येत असल्याचं अधिका­-यांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा