एक्स्प्रेस वेवर दरडी कोसळण्याची शक्यता, खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ हाय अलर्ट

July 3, 2016 8:51 PM0 commentsViews:

pune_express way 303 जुलै : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. सतर्क यंत्रणेनं तसा हायअलर्ट जारी केलाय. सध्या खंडाळा आणि लोणावळा भागात जोरदार पाऊस सुरु आहे. हा पाऊस असाच सुरु राहिल्यास घाटात दरडी कोसळण्याची भीती असल्याचं सतर्क यंत्रणेचे मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलंय. दरडी कोसळण्याचा धोका खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. दरडी कोसळू नये यासाठी गेल्या महिन्यात विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. मागील वर्षी जुलै महिन्यातच एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्यामुळे मोठा अपघात घडला होता. आता पुन्हा एकदा दरड कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा