बगदाद बॉम्बस्फोटाने हादरलं, ८२ ठार

July 3, 2016 1:27 PM0 commentsViews:

baghdad०३ जुलै : इराकची राजधानी बगदाद दोन शक्तिशाली स्फोटाने हादरली. या स्फोटात ८२ लोकांचा मृत्यू झाला. यात १५ मुलं, १० महिला आणि ६ पोलिसांचा समावेश आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटाची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.

बगदादमधील मध्य कराडा जिल्ह्यातील गर्दीने गजबजलेल्या भागात एका शॉपिंग सेंटरच्या बाहेर एका आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकाने भरलेला ट्रक उडवला. या स्फोटात ८२ लोकांचा मृत्यू झाला. जवळपास १७० लोक यात जखमी झाले. या स्फोटात१५ मुलं, १० महिला आणि ६ पोलिसांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर आयसिसने फलूजा शहर मुक्त करण्याचा इशारा दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा