केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, आठवलेंचं नाव चर्चेत

July 4, 2016 2:27 PM0 commentsViews:

 ramdash_athavale3

04 जुलै : अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काही नवीन चेहर्‍यांना यावेळी संधी दिली जाणार आहे. यामध्ये रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचंही नाव चर्चेत आहे.

नवी दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक झाली. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. सरकारमधले अनेक बडे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. आज संध्याकाळी अमित शहा आणि अरुण जेटली पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. जेटली याक्षणी दिल्लीत नाहीयेत, ते दुपारपर्यंत दिल्लीत येतील, असंही समजतंय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहर्‍यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून विनय सहस्त्रबुद्धे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. या शिवाय अनुप्रिया पटेल, भूपेंद्र यादव, एमजे अकबर यांचा मंत्रिमंडळात सहभाग शक्य आहे.

महाराष्ट्रातून कुणाची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत ?
विनय सहस्त्रबुद्धे
छ. संभाजीराजे
रामदास आठवले

इतर राज्यांमधल्या कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत
पुरुषोत्तम रुपाला
अजय टामटा
अनुप्रिया पटेल
महेंद्रनाथ पांडे
अर्जुनराम मेघवाल
पी.पी. चौधरी
एस. एस अहलुवालिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा