मी सहज कधीच बोलत नसतो, विचारपूर्वकच बोलतो -शरद पवार

July 4, 2016 2:35 PM0 commentsViews:

बार्शी – 04 जुलै : मी कधी सहज बोलत नसतो..विचारपूर्वकच बोलत असतो असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. संभाजीराजेंच्या निवडीवरून केलेल्या वक्त्याव्यावर विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

pawar_on_bjp_newsराज्यातील सेना-भाजपचं भांडण हे एक नाटक आहे. हे लोकसत्ता चालवण्यासाठी नाही तर सत्तेचा उपभोग घेण्यासाठी सत्तेवर आलेत अशी खरमरीत टीका यावेळी शरद पवारांनी केली. तसंच आंबेडकर भवन पाडल्याचा विषय राज्य सरकारनं योग्य पद्धतीनं हाताळणं गरजेचं आहे. हा लोकांच्या भावनेचा विषय आहे असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते बार्शीत पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर निवड केल्याबद्दल पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे आता पेशवे छत्रपतींची निवड करताय अशी टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा