बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पूर्वीचा गुन्हा उघड

April 5, 2010 11:41 AM0 commentsViews: 8

5 एप्रिलपुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष भोसले याने यापूर्वीही एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तसेच तिला आणि तिच्या नवर्‍याला सातत्याने धमकावल्याचे समजते. पीडित महिला नवर्‍याशी भांडण झाल्याने मुलासोबत वेगळी राहत होती. भोसलेने मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिला कुंटणखान्यात विकण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये तसेच पोलीस आयुक्तालयातही तक्रार दाखल करण्यात आली होती. कारवाई होत नसल्याने तिने कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर चतुश्रृंगी पोलिसांनी तपास केला. आर. आर. यांचे चौकशीचे आदेशपुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष भोसलेची तडीपारी रद्द करण्याचे आदेश कुणी दिले, याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. विधानपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच पुण्यातील आयटी परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी, गरज पडली तर वाकड येथे पोलीस स्टेशन बांधू, असेही आर. आर. पाटील म्हणाले. महिला संघटनांचा मोर्चादरम्यान या बलात्कार प्रकरणाचा निषेध म्हणून जनवादी महिला संघटनेने आज घोषणा देत निदर्शने केली. पोलीस आयुक्तांना एक निवेदनही देण्यात आले. बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष भोसले याची तडीपारी रद्द करण्यात हात असणार्‍यांवर कारवाई करावी, तसेच पुण्यातील नोकरदार महिलांच्या सार्वजनिक वाहतुकीबाबतच्या प्रश्नांवर बैठक बोलावून तोडगा काढावा, अशा मागण्या संघटनेने केल्या.

close