‘पासपोर्ट पाहिजे तर 1000 रुपये दे’, पोलिसाची खाबुगिरी कॅमेर्‍यात कैद

July 4, 2016 3:17 PM0 commentsViews:

पुणे – 04 जुलै : ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ असं पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे.. पण पोलीस दलाला काळीमा फासणारं काम अनेकदा पोलीसच करत असतात. पुणे ग्रामीण क्षेत्रात येणार्‍या मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यानं पासपोर्टच्या पोलीस व्हेरिफिकेशनसाठी चक्क हजार रुपयांची मागणी केली. आणि विशेष म्हणजे ही लाच मागताना दमदाटीचा सूर तर असा होता, जणू काही हे हजार रुपये भरणं कायद्यानं सक्तीचंच आहे. हजार रुपये दे नाहीतर पासपोर्ट मिळाला नाही म्हणून तक्रार करू नको, असं हा पोलीस स्पष्टपणे सांगतोय.manchar_police

सुमीत गावडे आणि शुभम थोरात ही दोन मुलं पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. 29 जूनची ही घटना आहे. पोलिसांकडे गेले असता अगदी मुजोरपणे हा पोलीस लाच मागताना कॅमेर्‍यात कैद झालाय. “1000 रुपये दे नाहीतर परत मला म्हणू नको पासपोर्ट मिळाला नाही” असा सज्जड दम या हवालदाराने दिला.

दरम्यान, या दोन्ही विद्यार्थ्यांनी आयबीएन लोकमतकडे ही कैफियत मांडली. आम्ही माहिती घेतली असता पुणे ग्रामीण पोलिसांना अशा व्हेरिफिकेशन साठी फक्त 100 रुपये घेण्याची परवानगी असल्याची माहिती समजली असून त्याची रीतसर पावती देणे बंधनकारक असल्याचेही समजते. मात्र, प्रत्यक्षात ठिकठिकाणचे पोलीस हवालदार मात्र 1 हजारापासून 5 हजारापर्यंत मनाप्रमाणे पैसे उकळतात असल्याचं उघड झालं आहे.

पोलिसाची खाबुगिरी

विद्यार्थी- हा सर पैसे… किती द्यायचे?
पोलीस- हजार रुपये
विद्यार्थी- एवढे
पोलीस- पासपोर्टला किती दिले?
विद्यार्थी- दिले सोळाशे रुपये. ऑनलाईन फी होती ती सोळाशे रुपये
पोलीस- इथले आण असे व्यवस्थित
विद्यार्थी- एवढे पण लय होतात
पोलीस- लय होतात मग त्यांना सांगायचे ना पासपोर्टवाल्यांना एवढे लय घेताय तुम्ही
पोलीस- पासपोर्टवाल्यांना विचारायचं ना तुम्ही एवढे का घेताय?
विद्यार्थी- मित्रांनी काय तरी 300 की 400 रुपये दिले होते
पोलीस- त्यांना तेवढं द्यायचंच नाय ना, मग त्यांना द्यायचे शंभर रुपये
विद्यार्थी- मित्रानं केलं ना काल.. माझ्याबरोबर झालं त्यानं 300 की 400 रुपयेच दिले
पोलीस- कुणी पासपोर्टची फी 300-400 रुपये कुणाला *** बनवतोय
पोलीस- कुणाला *** बनवतोय 300 ते 400 रुपये फी आहे
पोलीस- पासपोर्टची प्रिंट दाखवं
विद्यार्थी- माझी नाही बोलत मी तिकडची माझी आणि त्याची सोळाशे रुपयेच झाली फी
विद्यार्थी- तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनला घेतलं ना परवा…मित्राचे 300 का 400 रुपये घेतले
पोलीस- कोण आहे घेऊन त्याला ये इकडे… बोलवं ना त्याला इकडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा