भीक नको, हक्काचं तेच घेणार – उद्धव ठाकरे

July 4, 2016 4:26 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan

04 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. शिवसेना कधी लाचार होऊन कुणाकडे गेला नाही आणि जाणारही नाही, जे आमच्या हक्काचे आहे ते आम्ही घेणार, कुणाकडे भिक मागणार नाही अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.

शिवसेना भवनात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील मनसेचे ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्जत तालुका अध्यक्षांनी पक्ष प्रवेश केला. कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीमधील सर्व 13 सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या (मंगळवारी) होणार आहे.

नव्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा या विस्तारात समावेश नाही. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे, जे हक्काचं आहे ते घेणार असं म्हणाले.

शिवसेनेत प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्या कामात मी व्यस्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझी याबाबत कोणाशी चर्चाही झाली नाही. आम्हाला काय पाहिजे काय नाही हा प्रश्नच नाही. आम्हाला जे काही मिळावं ते सन्मानाने मिळालं पाहिजे. लाचार होऊन आम्ही कोणाकडे जाणार नाही, असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा