खड्डे बुजवा नाही तर अधिकार्‍याचं अपहरण करू, संदीप देशपांडेंचा इशारा

July 4, 2016 5:26 PM0 commentsViews:

dsadsad

04 जुलै : खड्‌ड्यांविरोधात मनसेचं अपहरण आंदोलन सुरू झालं आहे. मुंबईतील 185 क्रमांकाच्या वॉर्डात खड्डे आणि वृक्षांची छाटणी योग्य प्रकारे न केल्याचा आरोप करत मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी खड्‌ड्यांबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणा संदर्भात कारवाई न केल्यास सहाय्यक आयुक्तांचं अपहरण करू, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

मनसेचे मुंबई पालिकेतले गटनेते संदीप देशपांडे यांनी याबाबतच एक पत्रकच प्रसिद्ध काढलं आहे. खड्डे बुजवले पाहिजे हे बरोबर आहे, पण त्यासाठी एका अधिकार्‍याचं अपहरण करू, अशी धमकी देणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा