डबेवाल्यांचा डब्बा तब्बल 100 ते 150 रुपयांनी महागणार

July 4, 2016 6:57 PM0 commentsViews:

04 जुलै : मुंबईकरांना डबेवाल्यांकडून मिळणार्‍या डब्यांकरता आता 100 ते 150 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. डबेवाल्यांना पगारवाढ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं डबेवाल्या संघटनेनं सांगितलंय. नियमित डब्यांसाठी 100 रुपये तर मोठ्या डब्यांसाठी 150 रुपये इतकी ही वाढ असणार आहे. या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्याच्या पगारात ही दरवाढ लागू असणार आहे. तसंच 15 आणि16 जुलैला डबेवाले वारीसाठी जाणार असल्यानं दोन दिवस डब्यांची सेवा बंद असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा