नुसते आरोप झाले, पुरावे तरी द्या -एकनाथ खडसे

July 4, 2016 7:36 PM0 commentsViews:

जळगाव – 04 जुलै : मंत्रिपद गेल्यानंतर एकनाथ खडसे आतल्या आत धुमसतायेत. कारण जळगावात त्यांनी पुन्हा आपलं दु:ख बोलून दाखवलं. ‘काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचार्‍यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. कुणी पुरावेही दिले नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.’ अशा शब्दात राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी आपलं दु:ख मांडलं.khadse on kanada

आज जळगावातील जिल्हा बँक सभागृहात सुरू असलेल्या ग्रामसेवकांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघेही एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी त्यांनी भाषणादरम्यान आपल्या नेहमीच्या शैली नुसार टोलेबाजी केली.

आपल्यावर आरोप करणार्‍यांवर त्यांनी तोंडसुख घेतले, मात्र पक्षांतर्गत वादावर बोलणे सोइस्करपणे टाळले. जो काम करणार त्याच्याकडून चूका होणार, कुणाकडून विनाकारण त्रास होईल असं वागू नका, आम्हाला पुरावा नसतानाही उत्तर नाही देता येत काहीये. पुरावा नसताना शिक्षा होते याच उदाहरण मी अनुभवलेलं आहे, आणि त्यामुळे आजही मी म्हणतोय की एखादा पुरावा आणला तर मला समाधान मिळेल. पण पुरावा कोणी आणत नाहीये आणि माझं आव्हानही स्वीकारत नाहीये. कुणी तोंड काळं करायलाही येत नाहीये अशी व्यथाच खडसेंनी मांडली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा