मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेले 2 तरुण अर्नाळा समुद्रात वाहुन गेले

July 5, 2016 8:06 AM0 commentsViews:

arnala_beachविरार – 05 जुलै : वसई विरारमध्ये अर्नाळा समुद्रात दोन तरुण वाहुन गेल्याची घटना घडलीये. 20 तास उलटूनही या मुलांचा पत्ता लागू शकलेला नाही. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपाकी दोन मित्र समुद्रात उतरल्याने वाहून गेले. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे.

विरार गोपचरपाडा येथे राहणारे आशीष मोहिते वय 20 आणि अक्षय मोरे 22 हे आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्नाळा सागरी किनारी गेले होते. ते परत आलेच नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष आणि अक्षय हे आपल्या एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपला मित्रांसोबत आले होते. संध्याकाळी सागरी किनारी बसले असता, हे सर्व पाण्यात उतरले होते. पण अचानक आलेली मोठ्या लाटेत आशिष आणि अक्षय वाहून गेले. तर स्थानिकांना 3 जणांना वाचविण्यात यश आलंय. येत्या दोन दिवस सागराला मोठे उधाण आहे. तरी कुणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांनी केले आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा