मदिनावर आत्मघातकी हल्ला, 4 ठार

July 5, 2016 10:19 AM0 commentsViews:

madina305 जुलै : जगभरातल्या मुस्लिमांचं श्रद्धास्थळ असलेल्या मदिना इथं दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 4 सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिली आहे. इथं एका आत्मघातकी दहशतवाद्यानं स्वतःच्या कपड्यांमध्ये लपवलेला बॉम्ब उडवून दिला. ऐन रमजान महिन्यामध्ये मदिनावर असा हल्ला झाल्यामुळे खळबळ उडालीये. दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक मदिनाला भेट देत असतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा