जावडेकरांना कॅबिनेट बढती, आठवले-भामरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

July 5, 2016 12:05 PM0 commentsViews:

athavale_And_bhambure05 जुलै : गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंना मंत्रिपद मिळालं आहे.राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात रामदास आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मोदी मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि 19 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. पर्यावरण मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणार्‍या प्रकाश जावडेकरांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली. शपथ घेतलेल्या 19 राज्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातल्या रामदास आठवले आणि डॉ. सुभाष भामरे यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी उत्तर प्रदेशातल्या काही नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय.

दोन वर्षे जुन्या मोदी सरकारमध्ये सध्या 64 मंत्री आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ही संख्या 83 झाली आहे. या विस्तारात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांची समीकरणंही दिसतील. त्या पार्श्वभूमीवर काही नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आलीये. तर काहींना पदोन्नती देण्यात आलीये. मे 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा दुसरा विस्तार असेल. यापूवच् नोव्हेंबर 2014 मध्ये कें*ीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला होता.

नवे चेहरे

पुरुषोत्तम रूपाला
मनसुखभाई मंडाविया
जसवंतसिंह भाबोरे (गुजरात)
अर्जुन मेघवाल (राजस्थान)
एस.एस. अहलुवालिया (प. बंगाल)
अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश)
महेंद्र पांडे (उत्तर प्रदेश)
कृष्ण राज (उत्तर प्रदेश)
रामदास आठवले(महाराष्ट्र)
डॉ सुभाष भामरे (महाराष्ट्र)
अनिल माधव दवे
 फग्गनसिंह कुलास्ते (मध्य प्रदेश)
विजय गोयल (दिल्ली)
 अजय टमटा (उत्तराखंड)
 एम.जे. अकबर
पी.पी.चौधरी
रमेश जिगजिनगी
राजन गोहन
 सी.आर. चौधरी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा