राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीला लाचखोरी प्रकरणात अटक

July 5, 2016 1:26 PM0 commentsViews:

05 जुलै : राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना 4 लाखांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आलीये. त्यांच्यासह त्यांच्या 2 साथीरांनाही अटक कऱण्यात आलीये. किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख आहे.kishor wagh

एसीबीने 4 लाख रुपये लाच घेताना गजानन भगत आणि संदेश कांबळेला अटक केली होती. या लाच प्रकरणात किशोर वाघ यांचाही यात समावेश असल्याचा गजानन भगत आणि संदेश कांबळे यांनी एसीबीला सांगितलं आहे. त्यानुसार एसीबीने किशोर वाघ यांना अटक केली.

राष्ट्रीय ग्राहक न्यायालय दिल्लीने दिलेल्या निकालानुसार नुकसान भरपाई म्हणून मोठ्या रक्कमेचा चेक अदा करण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाने दिले होते. पण तो चेक अदा करण्यासाठी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ आणि त्यांचे दोन साथीदार गजानन भगत आणि संदेश कांबळे यांनी तक्रारदाराकडे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीला संपर्क केला आणि एसीबीने किशोर वाघ यांच्यासह त्यांच्या इतर दोन साथीदारांना 1 लाख रुपये आणि 3 लाख रुपयांच्या खोट्या नोटा ज्या सापळा रचण्याकरता वापरण्यात आल्या होत्या. अशा एकूण 4 लाख रुपयांच्या लाचेच्या रक्कमेसह एसीबीने गजानन भगत आणि संदेश कांबळे यांना अटक केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा