आता करवंदांपासून वाईन

April 5, 2010 2:40 PM0 commentsViews:

5 एप्रिलकोकणात करवंदापासून वाईन बनवणारा प्रकल्प फायद्याचा ठरणार असेल तर, सरकार एकास नऊ असे भागभांडवल देऊन शेतकर्‍यांच्या हितास प्राधान्य देईल, असे आश्वासन अजित पवार यांनी विधान परिषदेत दिले.धान्यापासून दारू बनवण्याच्या वादानंतर आता हा नवीनच मुद्दा समोर आला आहे.करवंदापासून मद्य निर्मितीचा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात सुभाष जोशी यांनी यशस्वी केला आहे. त्या धरतीवर करवंदाची बागायती शेती करता येईल काय? असा प्रश्न शेकापाचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

close