महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव

April 5, 2010 2:46 PM0 commentsViews: 176

5 एप्रिलमहाबळेश्वरमध्ये सध्या स्ट्रॉबेरी महोत्सव भरला आहे. स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन दिल्ली आणि मॅप्रो फॅक्टरी यांनी हा महोत्सव भरवला आहे. दरवर्षी गुडफ्रायडेपासून या महोत्सवाला सुरुवात होते. तीन ते चार दिवस चालणारा हा महोत्सव या वर्षी अजून आठ दिवस साजरा केला जाणार आहे. भिलार, गुरेघर गाव आणि मॅप्रो गार्डन इथे हा महोत्सव भरला आहे. या महोत्सवात तुम्ही मॅप्रो गार्डनमध्ये मॅप्रोच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्टसची चव घेऊ शकता. तेही मोफत. सोबतच स्ट्रॉबेरी वापरून तयार केलेला पिझ्झा, भेळ, आईसस्क्रीम यांचीही लज्जत चाखू शकता. या महोत्सवाचे मुख्य आर्कषण आहे, ते भिलार आणि गुरेघर गावातील स्ट्रॉबेरीची शेते. या गावातील शेतात जाऊन मनमुराद स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. तेही अगदी मोफत. पर्यटक आणि शेतकरी यांना जोडण्याचा हा एक अनोखा प्रयोग या महोत्सवाद्वारे करण्यात आला आहे.

close