हिट ऍण्ड रन: सलमानविरोधात आता सुप्रीम कोर्टात खटला दाखल

July 5, 2016 4:48 PM0 commentsViews:

Hit and run salman

05 जुलै : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी मुंबई हायकोर्टानं सलमानच्या सुटकेचा निर्णय दिला होता. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे.

सलमानची सुटका करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला होता. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका योग्य असून त्यावर सुनावणी घेण्यास आज कोर्टानं मंजुरी दिली. मात्र, फास्ट ट्रॅकवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा