गरिबांना 120 रुपये किलो दराने तुरडाळ – बापट

July 5, 2016 8:33 PM0 commentsViews:

oilseeds_Reuters1234

05 जुलै : गेल्या काही महिन्यांत तुरडाळीचे भाव गगनाला भिडल्यामुळे राज्य सरकारकडून सोमवारी तुरडाळ स्वस्तात रेशनच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी याबाबातची माहिती दिली आहे.

सध्या बाजारात तुरडाळीचे भाव 200 रूपये किलोच्या पुढे गेले आहेत. सरकारकडून रेशनच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार्‍या डाळीचा दर 120 रूपये किलो इतका असणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत येणार्‍या कुटुंबानाच त्याचा लाभ होणार आहे. प्रायोगिक तत्वावर 2 महिन्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

मात्र, 120 रूपये किलो हा दर पाहता सर्वसामान्य या योजनेला कितपत प्रतिसाद देणार, याबाबत शंकाच आहे. गोरगरीबांना डाळ देण्यासाठी ती ई-टेंडरिंगने खरेदी केली जाईल. महिन्याला रेशनिंग दुकानांमधून 84 कोटी 74 लाख किलो डाळ वाटप होईल. त्यासाठी 700 मेट्रिक टन डाळ केंद्रानं उपलब्ध करुन दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा