आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास राहणार खुलं

July 6, 2016 9:07 AM0 commentsViews:

06 जुलै : आषाढीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांची गर्दी वाढू लागल्याने, मंदिर समितीने आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दर्शन रांगेत अनेक तास तिष्ठत उभा राहणार्‍या वारकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.vitthu

देहू-आळंदी येथून पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. दररोज 50 हजाराहून अधिक भाविकांची पंढरीत वर्दळ सुरू आहे. या गर्दीमुळे देवाच्या दर्शनासाठी 5 ते 7 तासांचा अवधी लागत आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या नजीक आल्यानंतर यामध्ये मोठयाप्रमाणात वाढ होते. आणि यात्राकाळात तर दर्शनाचा कालावधी 25 ते 30 तासांपर्यंत जातो जातो. हा कालावधी कमी करण्यासाठी मंदिर समितीने विठ्ठल मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 6 जुलै ते वारीनंतरच्या प्रक्षाळ पुजेपर्यंत असणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा