गायक मिका सिंगविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल

July 6, 2016 9:21 AM0 commentsViews:

मुंबई – 06 जुलै : गायक मिका सिंग पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मिका सिंगविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आलाय. एका फॅशन डिझाइनर महिलेनं मिकावर छेडछाडीचा आरोप केलाय.mika singh arrest3

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिका सिंगने राहत्या घरी एका फॅशन डिझाइनर महिलेबरोबर छेडछाड केली होती. या महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मिकाच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही  महिला बळजबरीने मिकाच्या घरात घुसली होती. तीने मिकाकडून 5 कोटींची मागणी केली होती. या प्रकरणी मिकानेही या महिलेविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये. याआधीही राखी सावंत प्रकरणामुळे मिका सिंग अडचणीत सापडला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा