देशभरातील 10 कोटी विद्यार्थ्यांना दिले जाणार सोलार लॅम्प !

July 6, 2016 12:01 PM0 commentsViews:

06 जुलै : सौर ऊर्जा दिवे कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारकडून आयआयटी मुंबईला 1800 कोटी देणार असल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. या योजनेद्वारे देशभरातील 10 कोटी विद्यार्थ्यांना सोलार लॅम्प देण्यात येणार आहेत.

solar_lampया मिशनची सुरुवात 10 लाख विद्यार्थ्यांना लॅम्प देऊन करण्यात आली होती, आता या मिशनची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला अभ्यास करताना अंधाराचा सामना करावा लागू नये आणि स्वच्छ प्रकाश मिळावा असा या मिशनमागचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी आयआयटी मुंबईनं स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा याच राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. आता या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी केंद्र सरकारच्या 1800 कोटींव्यतिरिक्त इतर रक्कम कार्पोरेट्सकडून सीएसआरच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे. हा सोलर लॅम्प प्रत्येकी 120 रुपयांना विद्यार्थ्यांना मिळू शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा