बॉम्बे हायकोर्टाचे नामकारण करून काहीही साध्य होणार नाही, अणे उवाच

July 6, 2016 1:21 PM0 commentsViews:

06 जुलै : वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडल्यामुळे महाधिवक्ता पदावरुन पायउतार झाल्यानंतर श्रीहरी अणेंची टीका टीप्पणी सुरूच आहे.  आता तर त्यांनी केंद्राच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. बॉम्बे हायकोर्टाचे नामकारण करून काहीही साध्य होणार नाही, असं करणे म्हणजे न्यूनगंड आहे अशी टीकाही अणेंनी केली.

Aney123बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून ते आता मुंबई हायकोर्ट करण्याचा निर्णय काल(मंगळवारी) केंद्र सरकारने घेतला. मात्र, त्यामुळे काहीही साध्य होणार नाही असं मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. असं नामकरण करणं निरर्थक आहे असं ते म्हणाले. इतकंच नाही तर अशा प्रकारे नामकरण करणं हा न्यूनगंड असल्याची टीकाही अणे यांनी केली आहे.

यापूर्वीही अणे यांनी महाराष्ट्रविरोधी वक्तव्यं करून रोष ओढवून घेतला होता. वास्तविक बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर आता हायकोर्टाचंही नाव बदलावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत होतं. काल अखेर केंद्रीय मंत्रिमंडळानं याविषयी निर्णय घेतला. त्याचवेळी मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट आणि कलकत्ता हायकोर्टाचं कोलकाता हायकोर्ट असं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा