वनजमीन महाघोटाळा : जिल्हाधिकार्‍यांनीच वाटली 6 हजार हेक्टर जमीन !

July 6, 2016 4:38 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई 06 जुलै : वनसंवर्धन अधिनियम 1980 नुसार वनजमिनींच्या वाटपावर बंदी आहे, असं असताना काही जिल्हाधिकार्‍यांनी वनजमिनींचं अवैधरित्या वाटप केलं आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात अंदाजे 6 हजार हेक्टर वनजमिनीचं परस्पर वाटप केलं आहे. या जमिनी वनविभागाला परत मिळाव्यात, यासाठी सोलापूरचे वन अधिकारी महसूल विभागाचे उंबरे झिझवत आहेत. पण सोलापुरातल्या हस्तांतरीत वनजमिनीपैकी काही जमीन ही मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनीच वाटलेली असेल तर वनाधिकार्‍यांना न्याय मिळणार तरी कसा?

Forest land Scam

राज्यात अनेक जिल्हाधिकार्‍यांनी अगदी मुक्तहस्ते वनजमिनीचं वाटप केलंय. त्यातलंच सोलापूर जिल्ह्यातलं हे एक उदाहरण 1980 नंतर या जिल्ह्यात तब्बल 5980 हेक्टर वनजमीन जिल्हाधिकार्‍यांनी कुठलाही अधिकार नसताना वाटली आहेत. यात मुख्यमंत्र्यांचे आताचे सचिव आणि तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांचाही समावेश आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना परदेशी यांनी 1995 – 96 या काळात सुमारे 50 हेक्टर वनजमीन विविध संस्थांना वितरीत केलीय. ती परत मिळावी, यासाठी असं पत्रच सोलापूरच्या वनधिकार्‍यांनी शासनाला लिहिलंय.

खरंतर 1976 नंतर वनजमीन वाटपाचे अधिकार हे राज्यमंत्रिमंडळाला देण्यात आले आहेत. पण मंत्रिमंडळाने वनजमीन वाटप करण्याची हिंमत दाखवलेली नाही. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी मंत्रिमंडळापेक्षा मोठे कधी झाले. आणि त्यांनी नेमक्या कशाच्या आधारावर वनजमिनींची खैरात वाटली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा